Exclusive: अभिनेत्री मनीषा कोईराला आदिल हुसैनसोबत एका इंटरनॅशनल कॉमेडी सिनेमात दिसणार

By  
on  

अभिनेत्री मनीषा कोईरालाने कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाचा जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. मनीषा अलीकडेच संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ सिनेमात दिसली होती. यशिवाय ती नेटफ्लिक्सवरील ‘फ्रीडम’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. 
पीपिंगमूनच्य विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा अभिनेता आदिल हुसैनसोबत इंटरनॅशनल सिनेमात काम करणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Be the best version of you #smilemore #happyfaces

A post shared by Manisha Koirala (@m_koirala) on

 

मनीषा अटलांटावर बेस्ड सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. याचं नाव ‘ इंडिया स्वीट अ‍ॅण्ड स्पाईसेस’ आहे. गीता मलिक या सिनेमाच्या दिग्दर्शक आहेत. एक श्रीमंत, बिघडलेला कॉलेज गोईंग युवक एक रहस्य समोर आणतो. या दरम्यान त्याला त्याच्या परिवाराचं सत्य समजतं. अभिनेत्री सोफिया अली यात मुख्य भूमिकेत आहे. तर आदिल आणि मनीषा तिच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. मनीषा आणि आदिल या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे या दोघांचेही फॅन्स त्यांना पाहायला उत्सुक असतील यात शंका नाही.

Read More
Tags
Loading...

Recommended