Exclusive: य़शराज फिल्म्सच्या 'धूम 4' मध्ये अक्षय कुमार झळकणार नाही

By  
on  

यशराज फिल्म्सच्या 'धूम 4' सिनेमाबाबत ब-याच अफवांनी सध्या जोर धरला आहे. काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी कुमार या सिनेमात झळकणार असल्याच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. एका निगेटीव्ह भूमिका अक्षय या सिनेमात साकारत असल्याचं बोललं गेलं. परंतु पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्युझिव्ह वृत्तानुसार या बातमीत कुठलंच तथ्य नाहीय. 

अक्षयने 'धूम 4' संदर्भात कुठलीच कमिटमेंट केलेली नाही. मागच्या वर्षीपासून या अफवला पसरल्या आहेत की, अक्षय हा धूम 4 चा भाग बनतोय. यापूर्वी एका न्यूज चॅनलने 'धूम 4' मध्ये खिलाडी कुमार झळकणार असल्याचे वृत्त दिले होते पण नंतर यशराजने त्या वृत्ताचे खंडन केले. 

'धूम 4' हा यशराजसाठी महत्त्वाचा सिनेमा आहे. ह्रतिक रोशन, जॉन अब्राहम आणि आमिर खान यांसाऱख्या मोठ्या  कलाकारांनी यापूर्वी सिनेमात नकारात्मक भूमिका साकरल्या आहेत. पण 'धूम 4' संदर्भातील कुठलेच वृत्त अद्याप यशराजकडून देण्यात आलेले नाही. 

Read More
Tags
Loading...

Recommended