अनु आणि सिध्दार्थ असा साजरा करणार 'व्हॅलेंटाईन डे'

By  
on  

सध्या सर्वत्र गुलाबी थंडीचा माहोल पसरला आहे आणि त्यातच फेब्रुवारी महिना सुरु झालाय. फेब्रुवारी म्हटलं की प्रेमवीरांच्या हक्काचे दिवस. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे सर्वांना; वेध लागतात. छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी मालिका 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' .या मालिकेतील अनु आणि सिध्दार्थ या जोडीचा पहिला व्हॅलेंटाइन डे.मालिकेत ते तो खास सेलिब्रेट करताना पाहायला मिळतील.

सिद्धार्थचं अनुवर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरजं नाही. दोघंही प्रत्येक कठीण प्रसंगात नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले पाहायला मिळाले आहेत. 

 

लग्नानंतर पहिलाच व्हॅलेंटाइन डे असल्यामुळे तो खास करण्यासाठी सिद्धार्थ मनापासून प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनुला आवडणारी प्रत्येक गोष्टी तो यादिवशी करणार आहे.  

Read More
Tags
Loading...

Recommended